पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची 271.85 कोटी संपत्ती; कोणत्या पक्षाकडून उमेदवारी…

surendra-pathare
Share

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत. या यादीत माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे.

पुण्यातील धनाढ्य नेत्यांच्या यादीत पहिलं नाव येते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांचे. सुरेंद्र पठारे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी फिक्स झाली. सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पठारे यांच्याकडे एकूण 271 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे. पठारे यांच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा क्रिस्टा अशी अनेक वाहने आहेत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असून सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत. भाजपने उमेदवारी दिलेले सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे आहे. सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या सायली वांजळे यांनी काही दिवसांपूर्वी हाती कमळ घेतले. पुण्यातील वारजे भागातून सायली वांजळे या आधी नगरसेविका राहिलेल्या आहेत.

दरम्यान, राजकीय पक्षाच्या लढती स्पष्ट झाल्यानंतर आज इतर उमेदवारांनाही चिन्ह वाटप करण्यात येणार. अपक्ष उमेदवारांनी सुचवलेल्या चिन्हा मधून एका पुणे महानगर पालिकेची एकूण सदस्य संख्या 162 आहे. पुण्यात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. पुण्यात शेवटची महापालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती. यात भाजपने 97 जागा जिंकून बाजी मारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *