पुणे: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये बीडकर-धंगेकर लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. 2017 मधील नगरसेवकपदाच्या निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता. यावेळी गणेश बिडकर यांच्यासमोर रविंद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणवचे आव्हान असणार आहे. मात्र, याच प्रभागात आता अजित पवार गटाच्या उमेदवाराचीदेखील चांगली चर्चा होऊ लागली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून याठिकाणी गणेश नवथरे हे उमेदवार आहेत. त्यामुळे आता या प्रभागात नेहमीप्रमाणे दुहेरी नाही तर तिरंगी लढत रंगणार आहे. याचा फटका रवींद्र धंगेकर यांच्या मुलाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
भाजपकडून पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बीडकर, शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर आणि राष्ट्रवादीकडून गणेश नवथरे हे तिघे सध्या एका प्रभागत रिंगणात आहे. अजित पवार यांच्या उमेदवाराचं नाव नवीन असलं तरी ग्राऊंड रिलॅलिटी बघून अजित पवार यांनी गणेश नवथरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जाते.
रविंद्र धंगेकर यांनी गेल्यावेळी लढवलेल्या निवडणुकांमध्ये नवथरे मोठ्याप्रमाणावर सक्रिय होते. त्यांचे सगळं काम सांभाळायचे. त्यामुळे आता धंगेकर यांना भाजपच्या उमेदवाराकडून नाही तर थेट त्यांच्याच जवळच्या व्यक्तीच्या आणि अजित पवार गटाच्या गणेश नवथरे यांच्यापासून काही प्रमाणात धोका असल्याचे बोलले जात आहे. दोघांचेही कार्यकर्ते आणि बाकी यंत्रणा या उमेदवारीमुळे वाटल्या गेल्या आहेत. त्याचा फटका प्रणवच्या मतांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.