पुणे: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे आज (मंगळवार निधन झाले. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. परंतु, राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती आणि राजकारणात त्यांचा उतरणीचा काळ सुरु झाला. 2020 च्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते, ज्यात आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांची भेट घेतली होती.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
थोडक्यात परिचय…
सुरेश शामराव कलमाडी (जन्म: 1 मे 1944) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, माजी खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. सुरेश कलमाडी हे भारतीय राजकारणी, माजी खासदार (पुणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे) आणि क्रीडा प्रशासक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते, परंतु 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) घोटाळ्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचारारोपांमुळे अटकेची कारवाई झाली होती; ते पुणे लोकसभा मतदारसंघाचे अनेक वेळा खासदार राहिले आहेत. सुरेश शामराव कलमाडी अनेक वेळा लोकसभेचे सदस्य (खासदार) म्हणून पुणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष होते आणि 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष होते. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप होता, ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती, परंतु खटला अद्याप सुरू झालेला नाही. सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक (Pilot) होते आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले.
पंतप्रधानांवर पुण्यात चप्पल फेकून मारली…
एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती. त्यांचे राजकीय काळातील अनेक किस्से आजही मोठ्या चर्चेत असतात, त्यातीलच एक किस्सा म्हणजे सुरेश कलमाडी यांनी पंतप्रधानांवर पुण्यात चप्पल फेकून मारली होती. या घटनेमुळे पुण्यात चांगलाच गोंधळ झाला होता. तो काळ होता आणीबाणीनंतरच्या जनता सरकारचा…. सुरेश कलमाडी यांनी त्यावेळी मंत्री असलेले शरद पवार यांच्यामुळे राजकारणामध्ये एंट्री केली होती. त्यानंतर ते पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढे काँग्रेस सरकारला उतरती कळा लागल्यानंतर जनता सरकारमध्ये मोरारजी देसाई त्यावळचे पंतप्रधान बनले होते. आणीबाणीच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि दडपशाहीवरून जनता सरकारने इंदिरा गांधी आणि संजय गांधींच्या विरोधात हल्लाबोल करण्यास सुरूवात केली होती.
दुसरीकडे मोरारजी देसाई यांनी बदल्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर त्यावेळी देसाई देखील होते. याच दरम्यानच्या काळात मोरारजी देसाई यांचा पुणे दौरा ठरलेला होता. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात देसाईंच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन सुरू करण्यात आले होते. पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात पोहोचले, त्यांचा दौरा टिळक रोडवरून जात असतानाच टिळक स्मारकाजवळ सुरेश कलमाडींनी पंतप्रधान देसाईंवर चप्पल फेकून मारली आणि घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. सुरेश कलमाडी यांनी थेट पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याची बातमी संजय गांधी यांच्यापर्यंत पोहचली होती. प्रकरण वाढलं, याची चांगलीच चर्चा झाली पण सरकार पडल्यानंतर पक्षातील उतरत्या काळातही कलमाडींच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठींकडून कौतुक झाले.
पंतप्रधांनांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारण्याची घटना ही त्यांच्यासाठी राजकारणातील करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट ठरली. पुढे त्यांना पक्षात बढती मिळत गेली, मात्र,याच काळात जेव्हा शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले, त्यांनी आपला पक्ष स्थापन केला त्यावेळी कलमाडीही बाहेर पडले होते. पण ते परत स्वगृही परतले आणि काँग्रेस पक्षात आपली नवी ओळख निर्माण केली. पुढे त्यांना मंत्रीपदही मिळालं. अनेक वर्षे खासदारही राहिले. पुण्याच्या राजकारणातील खिलाडी म्हणून ओळखले जाणारे कलमाडी पुढे कॉमनवेल्थ गेमच्या घोटाळ्यात अडकले आणि त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागलं. त्यांना याप्रकरणी जेलची हवा खावी लागली.