मनोज जरांगेंनी पाणी घेणेही थांबवले

Share

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशी जरांगे यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास ठाम नकार दिला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न केल्याचा आरोप करत त्यांनी ही भूमिका घेतली आहे.

यापूर्वी, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या आवाहनानंतर जरांगे यांनी पाणी आणि ‘सलाईन’ घेण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, आता त्यांनी ही संमती मागे घेतली आहे. उपोषणाच्या ठिकाणी आलेल्या वैद्यकीय पथकाला त्यांनी कोणतीही तपासणी करू दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!