मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली असून, या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटे यांना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगितीची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्या. आर एन लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकडे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे. कोकाटे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी बाजू मांडली.
माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणते उपचार सुरू आहेत, याची माहिती न्यायालयाने घेतली. उपचार सुरू असल्याने तीन ते चार दिवसांचा तात्पुरता दिलासा देण्यात यावी, अशी मागणी कोकाटे यांच्या वकिलांनी केली. त्यावर कित्येकदा सांगूनही कोकाटे हजर झाले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. तसेच मी आजच निकाल देणार नाही, त्यामुळे आजच युक्तिवाद करावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.