मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का…

bmc
Share

मुंबईः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना महापौरपदी बसवण्यात येईल, असा दावा चित्रे यांनी केला आहे.

अखिलेश चित्रे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले… त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना विचारतात कि, “मुंबईचा महापौर मराठी असेल का?” त्यावर फडणवीस म्हणतात, “महापौर महायुतीचाच होणार…” शेलार म्हणतात, “महापौर हिंदू होणार…” पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही कि, महापौर मराठीच होणार ! ह्याचाच अर्थ त्यांचा मुंबई ‘महापौर’पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय…मोहित कंबोज ठरलाय ! मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा, असे आवाहन अखिलेश चित्रे यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीकडून एकत्र लढवली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यत्वेकरुन भाजप आणि शिंदे गटात जागावाटप होईल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षांचा जागावाटपात वरचष्मा असेल. परंतु, मुंबईची निवडणूक जिंकल्यास महापौर कोणाचा होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि शिवसेना दोघांकडून महापौर आमचाच असणार, असे म्हटले जाते. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. तर एकत्रित शिवसेनेने 84 जागांवर विजय मिळवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *