शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवण्याबाबत अजित पवार म्हणतात…

ajit-pawar
Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारारांचे आणि जनतेचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, चांगले नगराध्यक्ष निवडून आले. भाजप आणि शिवसेनेला चांगले यश मिळाले, असे अजित पवार म्हणाले. पण, यावेळी पत्रकारांनी आगामी महापालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत लढवणार का? या प्रश्नावर थोडं थांबा असे उत्तर दिले.

महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो, काँग्रेस सोबत त्यावेळी हा अधिकार त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला होता. आता देखील हा अधिकार त्या जिल्ह्यांना दिला होता. या निवडणुकीत कशा युत्या झाल्या ते जनतेने पाहिले आहे, निकाल लागलेला आहे. आम्ही महायुतीत काम करत असलो तरी भाजपला, शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना अधिक संधी द्यायची आहे, आम्हाला देखील आमच्या कार्यकर्त्यांना अधिक संधी द्यायची आहे. कार्यकर्त्याला देखील अधिक संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे आम्ही एकमेकांविरोधात लढलो. 29 महापालिकेत आमच महापौर व्हावा असे वाटते. राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्यापद्धतीने तिथले निर्णय जिल्हाध्यक्ष घेतील, असे अजित पवार म्हणाले.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मताची विभागणी झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यास अडचण येते. तिच मताची विभागणी नाही होऊन दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जाते. तिथले तिथले शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत आमच्या पक्षानं कमी जागा लढवल्या होत्या. आजच्या निकालावर आम्ही समाधानी आहे, कार्यकर्ता समाधानी आहे. पण, आम्हाला अजून काम करणं गरजेचे आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *