…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या: पंकजा मुंडे

Pankaja-Munde
Share

बीड : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्या पत्नीने डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनंत गर्जे सध्या अटकेत आहे.

पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी (ता. २५) भेट घेतली आहे. त्यावेळी गौरी पालवे यांच्या वडीलांनी पंकजा मुंडेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या, आपल्या मुलीला आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली, यावेळी मुंडे यांनी सांगितले की, यातून कोणीही सुटणार नाही. अनंत गर्जे याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला कल्पना असती तर मी अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या, पण मला याबाबत काही माहितीच नाही, मी तर कळलं तेव्हा खालीच बसले.’

पंकजा मुंडे बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावात गौरी पालवेच्या घरी दाखल गेल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या भेटीदरम्यान गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली. सोबतच आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. मंत्री पंकजा मुंडे यांना पाहताच गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेदेखील भावुक झाल्या होत्या.

माझ्याकडे गणपतीला आले होते, नटून थटून इतका सुंदर जोडा, मला काही माहिती नाही. माझा मुलगा असा वागला असता तर मी त्यालाही पाठीशी घातलं नसतं, या प्रकरणात पोलिस पूर्ण तपास करतील. पोलीस ज्या केसमध्ये पुरावा नाही, अशा केसचाही छडा लावतात. या पूर्ण पृथ्वीवर अनंत गर्जेंची बाजू कोण घेतंय सांगा मला, कोण त्याच्यासोबत आहे का? पोलिसांना तपास तर करुन दिला पाहिजे ना, दोन दिवसात काय होणार आहे, पोलिस सर्व तपास करतील, मी पोलिसांना एकही फोन केलेला नाही. मला काय माहिती तुमच्या घरात काय चालू आहे. तुम्हाला एवढं माहिती असूनही तुम्ही काही करू शकले नाही मग आम्हाला तर माहितीचं नव्हतं. कोण एकमेकांना वैयक्तिक जीवनातील प्रश्न विचारतं, सज्जन माणूस विचारतो का? जरा धीर धरा, मला कसं वाटेल आपल्या लेकीसोबत असं व्हावं, असेही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Buy Political Social Media Book WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
WhatsApp : 93712 69949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *