नवी दिल्ली : हिंगोलीचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. छातीत त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
भाजपकडून रामराव वडकुते यांना आठ महिन्यापूर्वीच राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून ओळख होती. रामराव वडकुते यांच्या निधनामुले हिंगोलीसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
View this post on Instagram
रामराव वडकुते यांची राजकीय कारकीर्द:
राज्यसभा खासदार रामराव वडकुते हे पूर्वी शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते होते आणि त्यांनी पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.
पक्षप्रवेश: ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला .
हिंगोली जिल्हाध्यक्ष: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, 2021 मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 7 महिन्या पूर्वी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.
महत्त्वाची पदे: त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
सामाजिक पार्श्वभूमी: ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…
नगरसेवकाची थेट महापालिका सहायक आयुक्तालाच मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद…
One thought on “खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…”