मुंबईः अगदी मोदी, राजनाथ सिंह यांनाही, तुम्ही हजारो पोलीस दिल्लीत आणून ठेवले आहेत, ते काय नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला आणून ठेवलेत? मुलांची डोकी फोडतायत. मुलं, मुलींना वेडवाकडं वाटेल तसं मारतायत, फरफट नेत आहेत, केस ओढतायत, कपडे फाडतायत, हे काय चाललंय? तुमचं दांडिया चाललंय? अशी राजवट ही गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच म्हणून आम्ही हे सगळे उभे आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रशांत भूषण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जर हे प्रश्न असं विचारणार असतील की यांना रेजीम चेंज (राजवट) करायचंय, मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, अगदी मोदी, राजनाथ सिंह यांनाही, तुम्ही हजारो पोलीस दिल्लीत आणून ठेवले आहेत, ते काय नवरात्रीमध्ये दांडिया खेळायला आणून ठेवलेत? मुलांची डोकी फोडतायत. मुलं, मुलींना वेडवाकडं वाटेल तसं मारतायत, फरफट नेत आहेत, केस ओढतायत, कपडे फाडतायत, हे काय चाललंय? तुमचं दांडिया चाललंय? अशी राजवट ही गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच म्हणून आम्ही हे सगळे उभे आहोत.’
View this post on Instagram
ठाकरे यांनी सांगितले की, हा गोवर्धन आहे, एकट्या-दुटक्याचं काम नाही. एकट्याची लेखणी हे काही करू शकत नाही, जसं सगळ्यांच्या करंगळ्या लागल्या होत्या तिकडे किंवा बोटं लागली होती, हातभार लागला होता, काठ्या लागल्या होत्या, तसं तुमचं सगळ्यांचा हातभार लागला, तर हा आपला लोकशाहीचा गोवर्धन आपण त्या पुरापासून वरती नेऊ शकू, नाहीतर आपण सगळे बुडालो म्हणून समजा, असे त्यांनी सांगितले. डोळ्यांसमोर एका मुलीच्या आयुष्याची वाट लागते, तसं आपल्या सगळ्यांच्या समोर देशाची वाट लागताना जर आपण गप्प बसणार असू, तर मग आपण आत्महत्या केलेली बरी, असंच मला वाटतं. कशाला जपतो आहोत आपण? काय अधिकार आहे आपल्याला जगण्याचा? अशी विचारणा त्यांनी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांनी राजवट बदलायची असल्याचे वक्तव्य केल्यानंतर जोरदार हल्ला चढवला होता. एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आणि सीजेपीकडून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय संघर्ष आणि अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे ते म्हणाले. ते डंके की चोट पर सरकार पाडण्याबद्दल बोलतात. लोकशाही संस्था नष्ट करणे आणि देशाला आग लावणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे.” ते वकील प्रशांत भूषण आणि आयसा अध्यक्षा नेहा बोरा यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत होते. राजनाथ सिंह म्हणाले, “सत्तापालट’ यांसारख्या शब्दांच्या वापरावरून हे स्पष्ट होते की, त्यांचा लढा निवडणूक सुधारणांसाठी नाही. तो एसआयआरसाठी नाही. तो ज्ञानेश कुमार यांच्यासाठी नाही. तो तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नाही.” उलट, देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.”
एकनाथ शिंदेंच्या वकिलांच्या एका मुद्द्यामुळे उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्ह गमावणार?
शिवसेनेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल; उद्धव ठाकरे यांचा विश्वास
उद्धव ठाकरे मैदानात! राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय…