नवनाथ बनला सांगेन, आम्ही वाघ आहोत, गाढव नाहीत: विवेकानंद पाटील

vivekanand-patil
Share

पुणे: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या विवेकानंद पाटील यांनी रविवारी मध्यरात्री सगळ्या मागण्या मान्य होताच एकच जल्लोष केला. या आंदोलनाच्या काळात विवेकानंद पाटील आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच गाजले होते.

सरकारने विद्यार्थ्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर विवेकानंद पाटील यांनी आंदोलनातील नेत्यांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या नवनाथ बन आणि विक्रम पाचपुते यांच्यासोबतचा हिशेब चुकता केला. हा विद्यार्थी एकजुटीचा विषय आहे. आमच्या एकीचा विषय झाला आहे. ज्यांना ही गाढवं अर्बन नक्सल वाटत होती, त्यांना मी सांगू इच्छितो की, भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, असे विवेकानंद पाटील यांनी म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मी नवनाथ बनला सांगेन, आम्ही वाघ आहोत, गाढव नाहीत, शिकार केलेय. कोणाच्या पण नादाला लागायचं, आमच्या नादाला लागायचं नाही, असा सणसणीत टोलाही विवेकानंद पाटील यांनी यावेळी लगावला. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. 11 दिवसांनी का होईना त्यांनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतला. शिवेंद्रराजे भोसले यांचेही आम्ही आभारी आहोत. आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. आम्ही चौकशीसाठी सरकारला 60 दिवस मुदत दिली आहे. तोपर्यंत विवेक भीमनवार हे पदावर नसतील. त्यांनी आता आयुष्यभरासाठी सुट्टी घ्यावी, असेही विवेकानंद पाटील यांनी म्हटले आहे.

विवेक भीमनवार यांचा राजीनामा न झाल्यामुळे काल सुरुवातीला विद्यार्थी नाराज होते. मात्र, नंतर भीमनवार चौकशीपर्यंत पदावर नसतील, या प्रस्तावाला विद्यार्थ्यांनी संमती दिली. याशिवाय, सरकारने पदभरतीच्या जागा वाढवल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे, तीन तारखेला परीक्षा आहे. बाकी तुमची रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, असेही विवेकानंद पाटील यांनी म्हटले.

एमपीएससी आंदोलकांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या; पाहा…
* आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली
* चौकशी होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
* भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
* दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
* एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
* आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन
* तीन वर्षात 70 हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
* 2027 मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
* मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही
* तहसीलदार भरतीत 60-40 ऐवजी 50-50 चा रेश्यो
* आयोगाची सदस्य संख्या 11 पर्यंत वाढवली जाणार
* एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
* पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य

पुण्यातील MPSC आंदोलनाला यश, चौकशी आयोगात कोण कोण? अन् विवेक भीमनवार यांची प्रतिक्रिया…

Video! विवेकानंद पाटील याचे पाहा साधे घर; उदय सामंत म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!