पाटणा (बिहार): नवीनच लग्न असूनही पहिले तीन महिने आमच्यात खूप भांडण व्हायची. आमचे विचार पूर्णपणे वेगळे होते. आम्ही दबावाखाली लग्न केले. त्यावेळी मी मंत्री होतो, बिहारचा आरोग्य मंत्री. मला घरी जावेसे वाटत नव्हते. कधी मी मित्राच्या घरी राहायचो, तर कधी दुसरीकडे जायचो, असे जनशक्ती जनता दल नेते तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे.
जनशक्ती जनता दल नेते तेज प्रताप यादव, जे ‘राईज अँड फॉल’ या स्ट्रीमिंग रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांनी पूर्व पत्नी ऐश्वर्या रायसोबतच्या त्यांच्या घटस्फोट आणि विभक्त होण्यामागील कारण उघड केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, त्यांची पत्नी तिच्या पूर्वीच्या प्रियकराशी संपर्कात होती. या शोमधील एक क्लिप आता व्हायरल झाली आहे.
View this post on Instagram
तेज प्रताप यांनी सांगितले की, ‘मी सकाळी ६ किंवा ७ वाजता पूजा करायचो. तिला ते आवडायचं नाही. यावरुन आमच्यात वाद व्हायचे. तिचा स्वभाव हा पहाटेपर्यंत पार्टी करण्याचा होता. एकेदिवशी मी रात्री घरी परतलो बेडरूममध्ये गेलो तेव्हा पाहिले तर दुसऱ्या मुलाशी चॅट करत होती, कालातरांने मला कळलं की तो तिचा बॉयफ्रेंड आहे. जेव्हा कधी ती माझ्याशी भांडायची तेव्हा मी पुरावासाठी म्हणून व्हिडिओ शूट करुन ठेवायचो. तो न्यायालयात सादर केला. मुलं नेहमीच चुकीची नसतात. मुलीसुद्धा चुकतात. आजही कधी भांडण झाली तर मी घाबरतो, मला भांडण आवडतच नाही. यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.’
दरम्यान, तेज प्रताप यादव हे आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्याने मे २०१८ मध्ये ऐश्वर्या राय नावाच्या मुलीशी लग्न केले. काही महिन्यांतच तेज प्रतापने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या जोडप्याचे विभक्त होणे हा एक मोठा कौटुंबिक वाद बनला, ज्यावर सर्वत्र चर्चा झाली. मे २०२५ मध्ये, लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रतापला राष्ट्रीय जनता दलातून सहा वर्षांसाठी काढून टाकले आणि एक कुटुंब सदस्य म्हणून त्याच्याशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली.
बिहार निवडणूक! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय…