Video! विवेकानंद पाटील याचे पाहा साधे घर; उदय सामंत म्हणाले…

vivekanand-patil
Share

पुणे: एमपीएससी आंदोलनामुळे चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील याचे मूळ घर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे आहे. त्याचे घर अतिशय साधे, पत्र्याचे आणि मातीच्या भिंतींचे आहे. विवेकानंद पाटील यांच्या आई-वडील शेती करतात. त्यांचे घर छोटे असून शेणाची जमीन आणि पत्र्याचे आहे.

विवेकानंद पाटील याचे घरही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी देखील विवेकानंद पाटील याच्या घराचा व्हिडीओ एक्सवर टाकत कौतुक केले आहे.

उदय सामंत म्हणाले, ‘सोशल मीडियावर आज एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडिओ दिसला. त्यांच्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो बघून आनंद झाला. स्वामी विवेकानंद म्हणायचे,” “ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान आणि एकाग्रता. एकाग्रतेच्या साहाय्यानेच विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचता येते”, असं उदय सामंत म्हणाले. तसेच विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, त्यापेक्षाही त्यांच्या घरातील पारितोषिकांनी माझ्या मनाला अधिक समाधान दिलं, असं म्हणत उदय सामंत यांनी विवेकानंद पाटील यांचं कौतुकही केलं. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभं आहे, एवढीच हमी यानिमित्तानं देतो, असे उदय सामंत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी विवेकानंद पाटील यांच्या परिस्थितीचे कौतुक केले आणि त्यांना आपल्या वतीने चांगले घर बांधून देण्याची घोषणा केली. विवेकानंद पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ही घर बांधून देण्याची ऑफर नम्रपणे नाकारली. मी तरुण आहे आणि माझ्यात काम करण्याची धमक आहे, मी परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छित नहीं, अशी भूमिका विवेकानंद पाटील यांनी मांडली.

सणासुदीच्या तोंडावर CNG च्या दरात पुन्हा वाढ, पाहा नवीन दर…

ज्ञानेश कुमारांचा १० ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा..? राहुल गांधींच्या आंदोलनादरम्यान या नेत्याचा दावा…

ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

एमपीएससी विद्यार्थी आंदोलन; पुणे शहर ठप्प होईल; रोहीत पवारांचा सरकारला दोन दिवसांचा निर्वाणीचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!