१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या मुंबईच्या स्मित मच्छार यांना अशोक चक्र देण्याची मागणी

Share

नवी दिल्लीः तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे वैमानिक कॅप्टन स्मित मछार, यांच्या अदम्य धैर्याची जगभरातून प्रशंसा होत आहे. बुधवारच्या या घटनेपासून त्यांच्या शौर्याची ऑनलाइन चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कॅप्टन मछार यांना शांतताकालीन शौर्य पुरस्कार आणि अशोकचक्र देऊन सन्मानित करण्याचे आवाहन, केंद्र सरकारकडे केले आहे.

कॅप्टन स्मित यांचे मूळ गाव असलेल्या मुंबईतील घाटकोपर आणि टिळक नगर परिसरातील रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिकांनी सोशल मीडियावर आपल्या परिसराच्या सुपुत्राचा अभिमान व्यक्त केला आहे. एमडी भाटिया शाळेतील त्याचे माजी वर्गमित्र आणि शेजाऱ्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

अपघातानंतर, कॅप्टन स्मित यांचा २०२५ मधील एक पॉडकास्टदेखील मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. त्यात, ते विमानातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीवर चर्चा करताना विचारतात, की जेव्हा आपण आकाशात असतो आणि काही अनपेक्षित घडते, तेव्हा आपल्याला कोण वाचवणार?

विमानात डॉक्टर असेल तर तुम्ही नशीबवान ठरू शकता, हे त्यांचे विधान व्हायरल झाले आहे. त्यामुळे विमानांमधील आपत्कालीन वैद्यकीय प्रणाली अधिक मजबूत करण्याची मागणी होत आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) भारतीय दूतावासाने जाहीर केले आहे की, कॅप्टन स्मित यांची प्रकृती आता चांगली असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे.

कॅप्टन मछार यांच्या पूर्वीच्या एअरलाइननेही (स्पाईसजेट) त्यांच्या सन्मानार्थ एक संदेश जारी केला. स्पाईसजेटने त्यांच्या अदम्य धैर्याबद्दल आदर व्यक्त केला आणि म्हटले, की त्यांच्या धाडसी निर्णयांनी आणि प्रसंगावधानाने असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!