गणेशोत्सवानंतर काय! विद्यानंद बापट यांचा पुढचा मोठा प्लॅन तयार; राजकारणात…

vidyanand-bapat
Share

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात आक्रमक भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे विद्यानंद बापट उत्सव संपल्यानंतर आता ते थेट ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

विद्यानंद बापट यांनी एका माध्यमाशी बोलताना आपल्या पुढील लढ्याची संपूर्ण रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘खुल्या वातावरणात केवळ रात्री १० नंतरच नाही, तर दिवसाही ध्वनिक्षेपकांवर पूर्णपणे बंदी असावी. यासाठी सध्याच्या ध्वनिप्रदूषणविरोधी कायद्यात मोठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेत (संसदेत) नवीन विधेयक मांडले जावे, म्हणून मी प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात देशातील काही प्रमुख लोकप्रतिनिधी आधीच माझ्या संपर्कात आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

डीजे आणि मिरवणुकांवर मत मांडल्यानंतर आता तुमच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा आहे, राजकारणात जाणार का? यावरती विद्यानंद बापट म्हणाले, नाही. हे म्हणजे टू मच अर्ली होईल म्हणजे जरी जायचं असेल तरी की अजून कशात काही नाही, म्हणजे ‘उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग’ असा प्रकार होईल. सध्या माझा संपूर्ण भर हा ‘सिटीझन ॲक्टिव्हिझम’ म्हणजेच नागरी मुद्द्यांवरच आहे. सध्या नाही, पण भविष्यात जर राजकारणात जाण्याची संधी मिळाली किंवा इच्छा झाली, तर कोणत्या पक्षाचे काम करणार आणि कशा पद्धतीने काम करणार? यावर विद्यानंद बापट म्हणाले, जर भविष्यात तसे ठरलेच, तर तो सामूहिक निर्णय असेल. आम्ही सर्व समविचारी एकत्र येऊन ठरू. जर निर्णय झालाच, तर कोणत्या विशिष्ट पक्षाकडून लढायचे की अपक्ष लढायचे, कोणती निवडणूक आणि कोणत्या पातळीवर लढायची, हे सर्व मुद्दे त्याच वेळी ठरतील. सध्या तरी बापट राजकारणात जाणार नाहीत, तसा विचार नाही, असेही बापट म्हणालेत.

यंदाच्या गणेशोत्सवातील आवाजाच्या पातळीवर बोलताना त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर आणि मंडळांवर नाराजी व्यक्त केली. “पुण्यातील गणेशोत्सवात यंदा डीजेचा आवाज अजिबात कमी झाला नाही. मंडळांनी नियम पाळून ध्वनिक्षेपक बंद करावेत, यासाठी मी स्वतः रात्री १२ नंतर ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी नोंदवल्या आणि प्रयत्न केले. पण दुर्दैवाने, विसर्जनाच्या दिवशीही आवाज कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.” असेही ते म्हणाले.

ॲड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर भाष्य केल्यानंतर, विद्यानंद बापट पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आले होते. यावर पूर्णविराम देत बापट म्हणाले “प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. राजकारणात गेल्यानंतर विचारांना अनेक प्रकारच्या मर्यादा येतात. त्यामुळे सध्या तरी माझा राजकारणात जाण्याचा कोणताही विचार नाही”

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर शरद पवार म्हणाले…

‘डीजे’चे स्तोम संपलेले दिसेल; ‘कायद्याचा बडगा नको; लोकांना विश्वासात घ्यायला हवे’; मुख्यमंत्र्यांचा दावा…

पुणे महापालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांचा अजब कारभार!

One thought on “गणेशोत्सवानंतर काय! विद्यानंद बापट यांचा पुढचा मोठा प्लॅन तयार; राजकारणात…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!