भाजपच्या महिला आमदाराबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची घसरली जीभ…

shweta-mahale-sanjay-gaikwad
Share

बुलढाणा: बुलढाण्यात भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार श्वेता महाले यांच्या पतीचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी धुमधडाक्यात साजरा केला होता. या कार्यक्रमादरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ हे लोकप्रिय गाणे वाजवण्यात आले होते. हे गाणं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनाच डिवचण्यासाठी तयार करण्यात आल्याची चर्चा होती.

Devabhau

याच गाण्याचा संदर्भ देत आमदार संजय गायकवाड यांनी महाले यांच्यावर थेट निशाणा साधला. गायकवाड यांनी म्हटले की, “बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोलले तर शोभून दिसते. पण एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे, तर बापासारखे शरीर कुठून आणणार? राजकारणातला खरा बाप कोण आहे हे आम्ही योग्य वेळी दाखवून देऊ.”

संजय गायकवाड यांनी म्हटले की, माझ्यासोबत विकास कामांवरुन स्पर्धा करा, मी शेतकऱ्यांना मदत करतो, तुम्ही पण करा. वाढदिवसाच्या दिवशी कोटीं रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा तुम्ही गरजूंना मदत करायला हवी. वाढदिवस आम्ही पण साजरे करतो, पण त्यात लोकांना मदत करतो, उधळपट्टी करत नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी आमदार महाले यांच्यावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने चर्चांना उधाण आले आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील भाजप विरुद्ध शिवसेना वाद अधिक उफाळून आला आहे.

राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठीच

महिलांवरील आक्षेपार्ह टिप्पणी खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा त्रिशा कृष्णनकडे इशारा…

One thought on “भाजपच्या महिला आमदाराबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची घसरली जीभ…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!