Exit Poll! आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल; नियम पाहा…

evm
Share

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीतील आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाआधीच एक्झिट पोल दाखवून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी धाराशिव 2.0 यासह तीन फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवर कलम 223, 337, 353, 66(ड) नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदानाआधी किंवा मतदान सुरू असताना एक्झिट पोल दाखवू नये, असा नियम आहे. मात्र, एक्झिट पोल दाखवला होता.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आले होते. यामुळे अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित एक्झिट पोलवर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. आक्षेप तक्रारीनंतर बारा दिवसांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅडमिनला अटक करणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, मतदाना अगोदरच टीव्ही चॅनेल तसेच समाज माध्यमांवर एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *