लाडक्या बहि‍णींसाठी रक्षाबंधनचे गिफ्ट थेट खात्यात…

Share

मुंबईः मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही कायमच चर्चेत राहिली आहे. या योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता महिलांना मिळाला नव्हता. पण आता रक्षाबंधनच्या आधी महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

सामाजिक न्याय विभागाचा ३४४ कोटीचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनच्या आधी महिलांना त्यांच्या जुलै महिन्याचा हफ्ता मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ९२ लाखांनी घटली आहे. ही योजना सुरु केली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या २ कोटी ४७ लाख इतकी होती. राज्य सरकारकडून ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ६२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली. याशिवाय इतर कारणांमुळं देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ई केवायसी पूर्ण केल्यानंतरच्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ६५ लाख इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *