भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून तीन नेत्यांना मोठी जबाबदारी; पाहा यादी…

Share

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज (सोमवार) जाहीर केल्या आहेत. नव्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्राला यावेळी महत्त्वाचे स्थान मिळाले असून, अनेक नेत्यांवर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

नव्या नियुक्त्यांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी यांच्यासह एकूण 13 नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Devabhau

महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तावडे यांच्यासह सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचाही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून कुणाची नियुक्ती…
विनोद तावडे: पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री (सरचिटणीस)
डॉ. भारती प्रवीण पवार: राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती.
पियूष गोयल: राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी.
प्रीती गांधी: सोशल मीडिया सह-संयोजकपदी निवड.

संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद कायम ठेवण्यात आले आहे. शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या नव्या यादीत कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, डॉ. भोला सिंह, डॉ. प्रदीप वर्मा, जगदीश ईश्वरभाई पटेल, डॉ. संदीप पाठक, फांगनॉन कोन्याक, संगीता यादव, अनिल अँटोनी, डॉ. एम. व्यंकटेशन, मनोज तिग्गा, सिद्धार्थ शंभू, डॉ. स्वदेश सिंह, मृगांक देव बर्मन, रोहन गुप्ता आणि जय प्रकाश यांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील नेत्याला राष्ट्रीय सचिवपद देण्यात आलेले नसले तरी, राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. राजस्थानचे राजेश मंगल यांची राष्ट्रीय संयुक्त कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाशी संबंधित जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. तरुण चुघ यांच्याकडे केंद्रीय कार्यालय प्रभारीपद सोपवण्यात आले आहे, तर महेंद्र पांडे यांची केंद्रीय कार्यालय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईशान्य भारतातील पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी डॉ. संबित पात्रा यांची नॉर्थ-ईस्ट कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव बब्बर यांच्याकडे नॉर्थ-ईस्ट संयुक्त समन्वयकपद देण्यात आले आहे. पक्षाच्या विविध सेल्सच्या समन्वयाची जबाबदारी विष्णू दत्त शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. रितुराज सिन्हा आणि विष्णू वर्धन रेड्डी यांची ऑल सेल्स संयुक्त समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

युवा आणि महिला मोर्चासह विविध मोर्चांची जबाबदारी
भाजपच्या विविध मोर्चांच्या अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली आहे. गुजरातचे डॉ. हेमंग जोशी यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी छत्तीसगडच्या रूप कुमारी चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे अमरपाल मौर्य यांची ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

मध्य प्रदेशचे बन्सीलाल गुर्जर यांच्याकडे किसान मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारचे शिवेश कुमार राम यांची एससी मोर्चाच्या अध्यक्षपदी, तर राजस्थानचे डॉ. मन्नालाल रावत यांची एसटी मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे कुँवर बासित अली यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन
राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे सिंधिया
तीरथ सिंह रावत
राम माधव
बैजयंत जय पांडा
डी. पुरंदेश्वरी
डॉ. भारती प्रवीण पवार (महाराष्ट्र)

राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (महाराष्ट्र)
सुनील बन्सल
बिप्लब कुमार देब
स्मृती इराणी
डॉ. सतीश पूनिया
गजेंद्र पटेल
हरीश द्विवेदी
संजय भाटिया
राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष
राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस (संघटन) शिवप्रकाश
सौदान सिंह
राष्ट्रीय कोषाध्यक्ष पीयूष गोयल (महाराष्ट्र)
राष्ट्रीय संयुक्त कोषाध्यक्ष राजेश मंगल
केंद्रीय कार्यालय प्रभारी तरुण चुघ
केंद्रीय कार्यालय सचिव महेंद्र पांडे
नॉर्थ-ईस्ट कोऑर्डिनेटर डॉ. संबित पात्रा
नॉर्थ-ईस्ट संयुक्त समन्वयक राजीव बब्बर
सर्व सेल्स समन्वयक विष्णू दत्त शर्मा
ऑल सेल्स संयुक्त समन्वयक रितुराज सिन्हा
विष्णू वर्धन रेड्डी
युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. हेमंग जोशी
महिला मोर्चा अध्यक्ष रूप कुमारी चौधरी
ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमरपाल मौर्य
किसान मोर्चा अध्यक्ष बन्सीलाल गुर्जर
एससी मोर्चा अध्यक्ष शिवेश कुमार राम
एसटी मोर्चा अध्यक्ष डॉ. मन्नालाल रावत
अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष कुँवर बासित अली
मीडिया कन्व्हेनर अनिल बलुनी
मीडिया को-कन्व्हेनर आशिष उषा अग्रवाल
प्रदीप भंडारी
सिद्धार्थ यादव
सोशल मीडिया प्रमुख दीपक म्हस्के
सोशल मीडिया को-कन्व्हेनर प्रीती गांधी
शिवानंद द्विवेदी
आलोक भट्ट
अरुण यादव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *