मुंबई: राज्य कारभाराचा प्रचंड ताण, मंगळवारची अत्यंत महत्त्वाची कॅबिनेट बैठक आणि पुण्याचे नियोजित दौरे असा अत्यंत व्यस्त दिनक्रम असतानाही, महाराष्ट्राची लोकभावना आणि एका सामान्य लेखकाच्या साहित्याचा सन्मान करत संतोष गाजरे लिखित ‘देवाभाऊ’ या विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई येथील ‘सह्याद्री अतिथीगृह’ येथे अत्यंत उत्साहात व दिमाखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘देवाभाऊ’ पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.
आपल्या अफाट व्यस्ततेतून वेळ काढत, एका सामान्य लेखकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत मनापासून शुभेच्छा देणाऱ्या ‘देवाभाऊ’ देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली. राज्यकारभारातील व्यस्तता बाजूला ठेवून साहित्याचा आणि लेखकाच्या मेहनतीचा असा गौरव करणे, हे केवळ एका अत्यंत संवेदनशील आणि गुणग्राही लोकनेत्यालाच शक्य आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या वेळी पत्रकार व पुस्तकाचे लेखक संतोष गाजरे, ईश्वरी प्रकाशनचे प्रकाशक संतोष धायबर ,पत्रकार संदीप कद्रे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी लेखकाच्या या साहित्यकृतीचे मनापासून कौतुक करत पुस्तकास आणि लेखकास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
One thought on “‘देवाभाऊ’ पुस्तकाचा सह्याद्री अतिथीगृहावर दिमाखदार प्रकाशन सोहळा!”