मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मोठा संकल्प…

Devendra-Fadnavis
Share

मुंबईः महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके असतील या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित केले. महाराष्ट्र देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालं आहे. सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करून आमच्या युवाशक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. जे देशाच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुसरून महाराष्ट्र सातत्याने विकास करत आहे. आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणार महाराष्ट्र पहिलं राज्य आहे याचा मला अतिशय आनंद असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, आज देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. याहीवर्षी पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8 टक्के आहे. आपण प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे. त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलं आहे. आणि इतरही जिल्हे त्याच पद्धतीने विकासाकडे अग्रसर आहेत. विकास हा केवळ काही टप्प्यांमध्ये नाही, तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मग गडचिरोली असो पालघर असो किंवा नंदुरबार असो अशा प्रत्येक भागामध्ये विकास पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय, असे त्यांनी सांगितले.

आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपण स्वप्न बघितलं होतं. 76 टक्के शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आहोत आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस सरकारचा Gen Z साठी डॅमेज कंट्रोल प्लॅन तयार; पाहा प्लॅन…

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची जोरदार चर्चा…

देवेंद्र फडणवीस यांची थेट बुलेटवरून विधानभवनात फिल्मी स्टाईल एन्ट्री…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *