राष्ट्रवादी काँग्रेस व बापूशेठ नायर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

bapu-nair
Share

‘भाईजी’ उर्फ बापूशेठ नायर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

पुणे (संदिप कद्रे): पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बापूशेठ नायर फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत बापूशेठ नायर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध लोककल्याणकारी व सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. नेहमीच्या भपकेबाजपणाला फाटा देत नागरिकांच्या थेट आरोग्याशी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित उपक्रम राबवून हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसरात भव्य महाआरोग्य शिबिर, एकदिवसीय मोफत ई-सेवा केंद्र तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by @mahabharatdotnews

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांची विविध प्रकारच्या आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांवर उपचार करून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्यात आले. शिबिरामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (डायबेटीस), किडनी तपासणी, संपूर्ण शरीराची तपासणी (फुल बॉडी चेकअप), स्त्रीरोग तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय पोटाचे विकार, आम्लपित्त, मधुमेह, आमवात आणि संधिवात आदी गंभीर आजारांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून निदान करण्यात आले.

केवळ प्राथमिक तपासणी न करता, शिबिरात आढळलेल्या गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी मोफत मार्गदर्शन करण्यात आले. हृदयविकार, अँजिओप्लास्टी, हर्निया आणि मोतीबिंदू यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी नागरिकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. बापूशेठ नायर फाउंडेशनच्या वतीने रुग्णांना पुढील उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

आरोग्य शिबिरासोबतच परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण ओळखून त्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे अनेक पालकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच, नागरिकांना शासकीय कागदपत्रे काढताना होणारा त्रास कमी करण्यासाठी एकदिवसीय मोफत ‘ई-सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी विविध शासकीय दाखले व योजनांसाठी मोफत अर्ज केले.

या भव्य सामाजिक उपक्रमाला परिसरातून व पुणे शहरातून नागरिकांचा, महिलांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, बापूशेठ नायर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व नायर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने राबवलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांमुळे बापूशेठ नायर आणि त्यांच्या फाउंडेशनचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

CJP आंदोलकांचा मोठा विजय! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा…

अमित शाहांसारखे अर्धशिक्षित मंत्री आहेत. स्वतः मोदी अर्धशिक्षित, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *