नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सोमवारी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चातील युवक-यवुतींना अमानुषपणे मारले. 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलं, 15-16 वर्षांच्या मुलींचे गळे पकडले होते. मी एका मुलीला पोलिसांनी मारताना स्वत: बघितले आहे. या मुलीचे कपडे पोलिसांनी फाडले आणि तिला छातीवर पाय देऊन मारले. एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीचे फटके मारले आहेत. त्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करायचे आदेश देण्यात आले होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आणखी मुलांचे खून करायचे आहेत का, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला. ते मंगळवारी दिल्लीच्या जंतरमंतर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
अभिजीत दिपके म्हणाले, ‘आम्हाला काल आमचा संसद मार्च मागे घ्यावा लागला. पोलिसांनी आणखी मुलांचं डोकी फोडू नयेत, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सरकारला मुलांच्या जिवाची चिंता नाही हे काल समजले. काल दिल्ली पोलीस ज्याप्रकारे काठ्या फिरवत होते, मुलांची डोकी फोडत होते, यावरुन एक लक्षात येते की, त्यांना आदेश होता की, कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना इतकं मारा की, पु्न्हा यांनी सरकारला प्रश्नच विचारले नाही पाहिजेत. पोलिसांना वॉटर कॅनन वापरता आले असते, पण पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.’
दिल्ली पोलिसांच्या लाठीमारात 150 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जी विद्यार्थिनी गळ्यावर काठ्या मारल्याने गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचं काही बरं-वाईट झालं तर त्याला पंतप्रधान मोदी जबाबदार असतील. दिल्ली पोलीस जंतरमंतर परिसरात तपासणी केल्याशिवाय कोणाला सोडत नाहीत. मग काल जंतरमंतरवर दगडाने भरलेले ट्रक कुठून आले. याचा अर्थ दिल्ली पोलिसांनी काल व्यवस्थित प्लॅनिंग केले होते. काल पोलिसांसोबत सिव्हिल ड्रेसमध्ये गुंडही लाठीमार करत होते. पोलिसांनी सोनम वांगचूक यांची पत्नी गीतांजली मॅडम यांच्यावर हल्ला केला. संदीप लांबा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे केस खेचले. माझ्यावरही लाठीमार झाला, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले.
Video: कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप; दगडांनी भरलेला डम्पर अन्…
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही…
धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…
खळबळजनक दावा! पंतप्रधान मोदी अन् अभिजीत दीपके यांची गुप्त भेट…