मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना, घटनादुरुस्तीसाठीच्या विधेयकासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शरद पवार गटाच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेत सगळा सस्पेन्स संपवला.
संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका अत्यंत सविस्तरपणे मांडली. शरद पवार, महाविकास आघाडी, पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहता कामा नये, यासाठी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. “मी कोणत्याही इतर माध्यमांशी थेट संवाद साधला नव्हता, जे काही आहे ते मी आता अधिकृतपणे सांगत आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
महाविकास आघाडीत (मविआ) मतदारसंघ पुनर्रचना आणि इतर विषयावरून गैरसमज पसरू नयेत, यासाठी सुप्रिया सुळे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी सांगितले की, “आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा विसंवाद राहू नये, यासाठी मी स्वतः शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते सतेज पाटील, आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या विधेयकाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अद्याप नवीन विधेयक आमच्याकडे आलेले नाही. ते विधेयक एकदा आमच्या हातात आले की, आम्ही त्याचा सखोल अभ्यास करू आणि त्यानंतर अवघ्या २४ तासांत आमची अधिकृत भूमिका जाहीर करू. महिला आरक्षणाचे विधेयक पूर्वीच एकमताने मंजूर झाले आहे, हे आजचे वास्तव असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, आम्ही कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. विधेयक समोर आला पाहिजे, मतदारसंघाचा फॉर्म्युला काय असेल हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कोणतीही भूमिका घेणार नाही. आम्ही सगळे इंडिया आघाडी म्हणून एकजूट आहोत.’
संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी बोलावलेल्या एका विशेष बैठकीचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. अमित शाह यांनी सांगितले की, त्यांनी काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पक्षासोबत स्वतंत्र बैठक घेतली होती, ज्यातून वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे दाक्षिणात्य राज्यांवर मोठा अन्याय होईल, अशी भीती दक्षिण भारतातील राज्यांना वाटत आहे, जी योग्यच आहे.’