नगरसेवक रमेश म्हात्रेला डॉक्टरांना मारहाण करणे भोवले; पोलिस कोठडी…

ramesh-mhatre
Share

ठाणे : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी अटकेनंतर आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर दोन दिवसानंतर कोर्टात हजर करण्यात आले. म्हात्रेला तीन दिवसांची पोलिस कोठीडी दिली आहे.

डॉक्टर आणि नर्सला झालेली ही मारहाण पाहून सर्व राज्याला धक्का बसला. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी शिंदे यांच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांसह हल्ला केला होता. गुन्ह्याबद्दल अटक केल्यानंर लगेचच रमेश म्हात्रेला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. परिणामी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यासाठी फिट असल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर म्हात्रेला उलट्याही सुरू झाल्या. परिणामी त्याच्यावर पुन्हा वैद्यकीय उपचार करावे लागले. त्यातच पोलिसांनी म्हात्रेला कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं उपस्थित करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र म्हात्रेला कोर्टात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश दिला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

कल्याण सत्र न्यायालयात रमेश म्हात्रेला आज हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्टाकडे पाच दिवसांची कोठडी मागितली होती. अखेर कोर्टाने म्हात्रेला सोमवारपर्यंत ( १३ जुलै) तीन दिवसांची पोलिस कोठीडी दिली आहे. रुग्णालयातच मुक्काम करण्यासाठी म्हात्रेची नाटकं सुरू असल्याचा आरोप केला जात असताना आता पुढील तीन दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे,

दरम्यान, रमेश म्हात्रे याच्यावर पक्षांतर्गत कारवाईची देखील शक्यता आहे. रमेश म्हात्रे हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा नगरसेवक आहे. रमेश म्हात्रेला पक्षाने पाठवली कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॅाक्टर मारहाण प्रकरणी तुमच्या पक्षाने कारवाई का करु नये, अशी विचारणा रमेश म्हात्रेला पक्षाने केली आहे.

डॉक्टरांनी फोन उचलला नाही, या कारणावरून रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रेवर आहे. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या म्हात्रेला डॉक्टरांच्या छत्रछायेखाली जावं लागले. मात्र रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांवर होणारे हल्ले गंभीर आहेत. परिणामी डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. डॉक्टर संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात येतेय. मात्र जो पर्यंत रमेश म्हात्रेला कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *