मोठी बातमी! राज्यात पुन्हा भूकंपाची शक्यता! शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत…

sharad-pawar-devendra-fadnavis
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आगामी काळात भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार का? यावर पक्षांतर्गत अत्यंत गुप्त पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संभाव्य राजकीय समीकरणाची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्यावर सोपवल्याचे समजते.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सध्या १० आमदार आणि ८ खासदार आहेत. केंद्रातील आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एनडीएला थेट सत्तेत सामील होऊन पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी, या दोन्ही पर्यायांवर पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. या बड्या नेत्याने पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

राजकीय वर्तुळात एकीकडे पडद्यामागे मोठ्या हालचाली आणि चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात असताना, शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. रोहित पवार यांनी पक्षाची भूमिका मांडताना स्पष्ट केले की, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा पूर्णपणे शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, रोहित पवार यांचा नकार आणि काँग्रेस नेत्यांनी दिलेला दुजोरा पाहता, शरद पवार गटात या विषयावरून दोन मतप्रवाह तर नाहीत ना? अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे. जर शरद पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. आता संपूर्ण राज्याचे लक्ष शरद पवारांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

उद्धव ठाकरे मैदानात! राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *