मराठ्यांचा कार्यक्रम अन् ब्राह्मण पहिल्या रांगेत; मेधा कुलकर्णी भर कार्यक्रमातून निघून गेल्या…

megha-kulkarni
Share

पुणे : भारतीय जनता पक्षामधील मराठा-ब्राह्मण जातीय वाद उफाळून आला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित असताना खासदार मेधा कुलकर्णी यांना जातीवरून डिवचण्यात आले. मराठ्यांचा कार्यक्रम असताना तुम्ही पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही, असे भाजप आमदार अभिमन्यू पवार म्हणाल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. आमदार पवार यांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर कार्यक्रम सुरू व्हायच्या पहिल्या मिनिटालाच मेधा कुलकुर्णी यांनी रागाच्या भरात कार्यक्रम सोडून निघून जाणे पसंत केले.

छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सारथी संस्थेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विविध पक्षाचे आमदार-खासदार उपस्थित होते. याच कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रम सुरू व्हायला काही मिनिटे बाकी असताना इतर नेत्यांचे आगमन झाले, काही नेते स्थानापन्न होत होते. त्यावेळी “कार्यक्रम मराठ्यांचा आहे, मेधाताई आपण पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही”, असा टोमणा अभिमन्यू पवार यांनी मारल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. त्यामुळे अभिमन्यू पवार यांचे बोलणे मेधा कुलकर्णी यांना खटकल्याने त्याने लगोलग कार्यक्रम सोडला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही. मात्र माध्यम प्रतिनिधींना समजल्यावर त्यांनी मेधा कुलकर्णी यांना घडलेल्या घटनेविषयी विचारले. त्यावर त्यांनी अभिमन्यू पवार यांच्या वर्तनावर संताप व्यक्त करीत “तुम्ही अजूनही मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) समजता काय? असे विचारून डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र मेधा कुलकर्णी यांचा घटनेवरील दावा अभिमन्यू पवार यांनी फेटाळून ताई खोटे बोलत असल्याचे म्हणाले.

अभिमन्यू पवार यांचे वर्तन खरोखर आक्षेपार्ह होते. ते एका मतदारसंघाचे आमदार आहेत. पण ते अजूनही स्वत:ला मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी समजतात की काय? की स्वत:ला सुपर सीएम समजतात? असा उद्वेग मेधा कुलकर्णी यांना व्यक्त केला. कार्यक्रमात झालेला वाद हा बसण्यावरून झालेला वाद नाही तर जातीयवादावरून झालेला आहे. मराठ्यांच्या कार्यक्रमात ब्राह्मण समाजाचा कुणी पुढे बसले तर वाद कसा झाला असता? असेही कुलकर्णी यांनी विचारले. दुसरीकडे मराठा समाजासाठी काम करणाऱ्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांचा दावा खोडत आमदार अभिमन्यू पवार यांची बाजू घेतली. पवार यांची कुठेही जातीचा उल्लेख केला नाही, ताईंचा गैरसमज झालेला दिसतोय, असे नरेंद्र पाटील म्हणाले.

दरम्यान, खासदार मेधा कुलकर्णी यांना कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा मारला. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही म्हणताच मेधा कुलकर्णींनी रागात कार्यक्रम सोडला, त्या भर कार्यक्रमातून निघून गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात आणि कार्यक्रमस्थळी या घटनेची चांगलीच चर्चा रंगली.

दरम्यान, या कार्यक्रमानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ताईंचा गैरसमज झाला आहे, मी त्यांना एवढेच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण, ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू मी त्यांना एवढेच बोललो आहे, यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही, असे स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी दिले.

मी ताईला देखील विनंती करतो की, मी काय बोललो ते तुम्ही आठवून बघा. हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही, त्या माझ्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत. त्यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रमातून निघून जावं की बसावं हा त्यांचा विषय आहे. मात्र, पुढे एकच खुर्ची रिकामी होती म्हणून त्यांना विनंती केली, असेही त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *