Video: मी खासदार; तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर…

sanjay-dina-patil
Share

मुंबईः उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना त्यांनी शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा.

संजय दिना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत.’ त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाची नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परखड प्रश्न विचारणाऱ्यांना पत्रकारांसोबत संजय दिना पाटील यांनी गैरवर्तन केले. मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे. तुम्ही माईक माज्या तोंडासमोर कशाला ठरता, आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय, असे बोलताना संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

माझा शिवसैनिकांसोबत कोणताही वाद नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही माझ्यावर उपकार आहेत. त्यांच्यामुळे मी खासदार झालो. जे नेते माझ्याविरोधात बोलत आहे, ते स्वत:ची सुरक्षा सोडून इकडे काही करायला येणार आहेत का? हे काही करणार, तेव्हा आम्ही मार खाऊन घ्यायचा का? हे लोक स्वत:च्या दादा लोकांकडून फोन करतात, सिक्युरिटीसाठी, ती केस पण दाबून टाकली. ती केस काढायला सांगा ना. मी संजय राऊत यांना खूप मानसन्मान दिलाय. 2004 मध्ये शिवसेनेच्या लीलाधार डाके यांच्याविरोधात मी निवडून आलो तेव्हा संजय राऊत यांनी मला मदत केली. किरीट सोमय्या यांच्याविरोधातही त्यांनी मला मदत केली होती. ही शिवसेनेविरोधात गद्दारी नव्हती का? मी आम्ही पाच लोकं मारली, जे बोललो ती घटना माझ्या जन्मापूर्वीची आहे. मला दहा लोकं लागत नाहीत, मी लोकांच्या मनावर राज्य करतो. शिंदे साहेबांनी माझ्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट मला शाबासकी दिली. मी मर्द लोकांबरोबर गेलो आहे, मर्दांची कदर करतात, ते नाराजी व्यक्त करत नाहीत, शिंदे साहेबांनी मला शाबासकी दिली आहे, असेही संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे.

ऑपरेशन टायगर २ आणि 3 होणार; शिवसेना खासदाराच्या दाव्याने खळबळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *