रामदास कदम यांचा ठाकरे यांना टोला; पक्षात तिघेच राहणार, देखो आगे क्या होता है…

ramdas-kadam
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून बहुचर्चित ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अखेर यशस्वी केल्याची चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि भासक्र जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे. तसेच भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले.

आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत असल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. सर्वांना चालते व्हा म्हणण्याने मराठी माणसाचे नुकसान होत आहे. लहान तोंडी मोठा घास घेतोय. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर तांत्रिक अडचण येणार नाही. उद्धव ठाकरे यांना कायदेशीर आणि प्रशासकीय कामाचा अनुभव नाही, अशी टीकाही रामदास कदम यांनी केली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, चाळीस आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले. नैतिकता असेल तर राजीनामा का दिला नाही? जगा सांगे ब्रह्मज्ञान… भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान रामदास कदमांनी दिले. ये दिन कट जायेंगे… देखो आगे क्या होता है…म्हणत भास्कर जाधवांना इशारा दिला आहे. ठाकरे गटात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, ऑपरेशन टायगर पूर्ण झालं की नाही याबाबत अद्यापही दोन्ही पक्षाकडून भूमिका स्पष्ट नाही. याशिवाय, ठाकरेंचे खासदारही माध्यमांपुढे येऊ आपली भूमिका मांडताना दिसत नाही. त्यातच, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप बजावला असून उद्या खासदारांची बैठक असल्याची माहिती दिली होती. तसेच, आता राडा होईल म्हणत फुटणाऱ्या खासदारांना संजय राऊत यांनी थेट इशारा देखील दिला होता. आता, खासदार अरविंद सावंत यांनी कुठलंही ऑपरेशन सक्सेस झालं नाही, सर्वच खासदार आमच्यासोबत असल्याचं म्हटलं. तर, दुसरीकडे आज झालेले ऑपरेशन टाइगर फुल प्रूफ झालं असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे.

उद्धव साहेब खचणारे नाहीत, विरोधकांच्या छातीवर पाय ठेवून उभे राहतील…

ऑपरेशन टायगर! शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता असणाऱ्या खासदारांची पाहा नावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *