रोहित पवार यांची प्रकृती खालावली; भूमिकेवर ठाम, म्हणाले…

rohit-pawar
Share

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे आंदोलन सुरू आहे. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे.

दोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावली असून त्यांची साखरेची पातळी कमी झाली आहे. असे असूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडत असतानाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला थेट इशारा दिला आहे. “सरकारकडून गेल्या तीन दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही,” असे रोहित पवार म्हणाले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

“पवार कुटुंबातील असलो तरी सर्वसामान्यांसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मोठ्या कुटुंबातील असलो तरी जबाबदारीनुसार सर्वसामान्यांसाठी लढा देण्याची शिकवण आम्हाला पवार साहेबांनी दिली आहे. जोपर्यंत जाचक अटी काढल्या जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर मी ठाम आहे. आता कुटुंबीयांची काळजीही वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी मंडपातच अन्नत्याग आंदोलन करत आहे. आता माझी आई, पत्नी आणि मुलेही चिंतेत असून ते आज माझ्या भेटीसाठी येणार आहेत,” असे देखील रोहित पवार यांनी म्हटले.

आमदार रोहित पवार यांनी शासनाला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. “आज जर शासनाकडून अटी मान्य न झाल्यास उद्या सकाळी विठू माऊलीच्या दारात नामदेव पायरी येथे आंदोलन सुरू करण्याचा मानस आहे,” असा इशाराही रोहित पवार यांनी शेवटी बोलून दाखवला. त्यामुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

निवडून येण्यासाठी 50 कोटीचा आकडा बघून उमेदवार कचरले : रोहित पवार

पुण्यात रोहित पवार यांचे मनसे स्टाइलसारखं खळ्ळखट्याक…

रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *