मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांना आज (बुधवार) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना रुबी हॉल क्लिनीकमध्ये अॅडमिट केलं होतं. तिथे चार ते पाच दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हा डॉक्टरांनी पवारांना तब्येतीची विशेष काळजी घेण्याची सूचना दिली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीत कोणतीही गंभीर समस्या उद्भवलेली नाही. ते केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. वाढते वय, सततचे दौरे आणि राजकीय-सामाजिक कार्यक्रमांमधील व्यस्त दिनक्रम यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही आरोग्य चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.
शरद पवार यांना केवळ रुटीन चेकअप साठी रुग्णालयात दाखल केले आहे. येथील चेक अप झाल्यानंतर पवारांना डिस्चार्ज देण्यात येईल. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…
मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली…
शरद पवार यांची प्रकृती बिघडली; कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह रवाना…