देवेंद्र फडणवीस यांची थेट बुलेटवरून विधानभवनात फिल्मी स्टाईल एन्ट्री…

Devendra-Fadanvis-bullet
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन काटकसरीचे आवाहन केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि अधिकाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्र्यांनी वाहनाचा ताफा कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (गुरुवार) थेट बुलेट चालवत विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या या साध्या आणि ‘स्टायलिश’ प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देखील होते.

मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः बुलेट चालवत होते. हेल्मेट घालून आणि ट्रॅफिकच्या सर्व नियमांचे पालन करून हा प्रवास पूर्ण केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलीस-कर्मचारी देखील बाईकवरूनच विधान भवनात दाखल झाले. विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या १० आमदारांचा आज शपथविधी आहे. या शपथविधी कार्यक्रमात हजर राहण्यासाठी मुख्यमंत्री फडवणीस हे आज बुलेटवरून विधीमंडळात दाखल झाले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल, असा निर्णय घेण्यात आला. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा असेही बैठकीत ठरवण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीसांची नियमावली, 5 महत्त्वाचे निर्णय; ताफ्यातील वाहने अन् दौरे…

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री भेट…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *