पुणे विद्यापीठातील कथित गैरव्यवहारांवर गंभीर आरोप…

pune-university
Share

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ म्हणून ओळखले जात असले, तरी २०१७ नंतर विद्यापीठाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. विद्यापीठातील काही पदाधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले आहेत.

नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात प्रसेनजीत फडणवीस, राजेश पांडे, बागेश्री मंठाळकर आणि राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपांनुसार, विविध कंपन्यांच्या माध्यमातून विद्यापीठातील कंत्राटे मिळवून आर्थिक लाभ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑडिट अहवालात विद्यापीठाच्या ठेवी मोडल्यामुळे सुमारे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याचा आरोप आहे. तसेच, काही बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला नसल्याने बेकायदेशीर कामे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

डेटा सेंटर प्रकल्पातही अनियमितता झाल्याचे सांगितले जाते. एकाच कंपनीला टेंडर देणे, तसेच उपकरणांच्या खरेदीत मोठा दरफरक आढळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई टाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. परीक्षा विभागातील नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप, ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचे कंत्राट, तसेच G20 परिषदेदरम्यान झालेल्या सुशोभीकरणाच्या कामातही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. फायबर ऑप्टिक प्रकल्प आणि क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज टेंडरमध्येही नियमबाह्य प्रक्रिया राबविण्यात आल्याचे सांगितले जाते. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये दबाव टाकून विषय दडपण्याचा प्रयत्न, सिनेट सदस्यांना धमकीवजा सूचना, तसेच फॉरेन्सिक ऑडिट होऊ न देण्याचे प्रयत्न केल्याचेही आरोप आहेत.

दरम्यान, या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत असून, संबंधितांवर कारवाई करावी, तसेच फॉरेन्सिक ऑडिट तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *