मुंबईः लोकसभेत महिला आरक्षण (Women Reservation Bill) घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर मंगळवारी (ता. २१) मुंबईत भाजपकडून विरोधी पक्षांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. वरळीच्या जांबोरी मैदान ते एनएससीआय डोमपर्यंत हा भाजपचा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र या जनआक्रोश मोर्चामुळं जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला. सदर महिलेने गिरीश महाजन यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सदर महिलेने गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा…शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवालही महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
मुंबईत काल घडलेल्या घटनेनंतर आज माध्यमांशी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. गिरीश महाजन म्हणाले, ‘वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्च्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचे होते. पुढच्या वेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही.’
महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे.
महिला आरक्षणाच्या आडून… pic.twitter.com/XqsPfhZY9c
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) April 21, 2026
महिला पोलिसाने गिरीश महाजन यांना विचारला जाब, सस्पेंड केलं तरी चालेल…
तुम्ही पालकमंत्री म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत; गिरीश महाजन प्रकरणावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का…