पुणे (किरण कद्रे): प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे कार्यरत कंत्राटी कामगारांवर लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था या सफाई ठेकेदाराकडून सातत्याने अन्याय व शोषण होत आहे. भ्रष्ट सफाई ठेकेदाराला काळया यादीतून कोण वाचवतोय? असे म्हणत आम आदमी पक्षाकडून प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
विशेषतः खालील कामगारांना मार्च २०२६ महिन्याचा पगार अद्याप देण्यात आलेला नाही…
मनीषा वायदंडे, अनिता भारती, अनिता गायकवाड, सविता पंडित, सुरेखा कांबळे, जनाबाई भारती, पार्वती मोरे, सुनंदा गाडे, शीला कांबळे, लक्ष्मी लठार, शशिकला ढगे, शीला ठोकळे, मारिया गायकवाड, लैला शेख, शैलेश जाधव, मनोहर कांबळे, रेश्मा गायकवाड

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सदर कामगारांवर संबंधित ठेकेदाराकडून हॉस्पिटलमध्ये काम करू नये म्हणून दबाव टाकण्यात आला, ज्यामुळे मनोरुग्णांना स्वच्छतेचा त्रास होईल व प्रादेशिक मनोरुग्णालयाची बदनामी व्हावी तसे केले नाही म्हणून त्यांचा पगार रोखण्यात आला. हा प्रकार कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर आघात करणारा आहे. गंभीर बाब म्हणजे, प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हाच प्रकार सर्रास सुरू आहे. ठेकेदार बदलतात, पण कामगार तेच राहतात. प्रत्येक वेळी ठेकेदारांकडून कामगारांची आर्थिक लूट केली जाते. कामगारांना नाईलाजास्तव न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो आणि ३ ते ४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरच त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळतात. ही जणू एक “प्रथा”च बनली आहे, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था या ठेकेदाराविरोधात यापूर्वीही प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे आर्थिक घोटाळे, किमान वेतनातील तफावत, पीएफ व ईएसआयसी संदर्भातील अनियमितता याबाबत चौकशी समितीचा अहवाल व ठोस पुरावे उपलब्ध आहेत. तरीदेखील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे.
आम आदमी पक्षाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे…
* वरील सर्व कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे
* संबंधित ठेकेदार लोकराज्य स्वयंरोजगार सेवा संस्था ला त्वरित काळ्या यादीत टाकावे
* कामगारांवर दबाव टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी
* चौकशी अहवाल सार्वजनिक करावा
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस यंत्रणा उभारावी
ही लूट व अन्याय थांबवण्यासाठी माननीय आरोग्य मंत्री श्री प्रकाश अबिटकर यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. या मागण्यांसाठी आजपासून प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे उपोषण सुरू करण्यात येत आहे.
माननीय आरोग्य मंत्री महोदयांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
संजय कोने
– आम आदमी पार्टी (कामगार आघाडी), महाराष्ट्र राज्य.