मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली. रुग्णालयात दाखल असल्याने शरद पवार आज बारामतीमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांना नियमित तपासणीसाठी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्या विविध तपासण्या सुरू आहेत. या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
दरम्यान, शरद पवार यांना मागील महिन्यात प्रकृती अस्वास्थामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या सामान्य आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील प्रकृती आणि त्यांचे वय लक्षात घेता, केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच डॉक्टर त्यांच्या पुढील उपचारांबाबत किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेणार आहेत.
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. बारामतीमध्ये होणारी प्रचाराची सांगता सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, मात्र प्रकृतीमुळे पवार या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. आजच्या बारामतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे नेते असणार आहेत. तर, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या प्रचार सभेत असणार आहेत.
बारामतीत बॅनरची चर्चा! शरद पवार यांनी सांगूनही सुनेत्रा पवार यांनी नाही ऐकलं…
शरद पवार यांचे बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान…
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार…
मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली…
शरद पवार यांची प्रकृती बिघडली; कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह रवाना…