बारामतीमधील पानं-फुलंही दादांच्या आठवणीत रडत आहेत…

ajit-pawar
Share

बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीमधून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ आज (सोमवार) फोडला. यावेळी संपूर्ण बारामती आपलं कुटुंब असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी दिवगंत अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शरद पवार गटाने आपला उमेदवार न दिल्यामुळे सुप्रिया सुळे यांचेही आभार मानले.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वच नेत्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भावुक झाल्याचे दिसले. “अजितदादा हे बारामतीचा श्वास होते आणि त्यांचा अखेरचा श्वासही याच बारामतीच्या मातीत विसावला. आज संपूर्ण बारामतीत त्यांचा स्पर्श जाणवतोय, इथली न बोलणारी पानं-फुलंही दादांच्या आठवणीत रडत आहेत,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या निधनानंतर लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीकरांशी अत्यंत भावूक संवाद साधला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही पोटनिवडणूक अशा परिस्थितीत होईल. दादा आपल्यात नाहीत, हे मला आजही वाटत नाही आणि हे मला कधीच मान्य होणार नाही. पण नियतीने हा कठीण काळ आपल्या सर्वांवर आणला आहे. दादांचे जाणं ही केवळ एका कुटुंबाची हानी नसून संपूर्ण बारामतीची हानी आहे. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विकासाचा वारसा मी पुढे नेईन. बारामतीचा विकास कधीही थांबणार नाही आणि इथल्या प्रशासनावरील वचक तसाच राहील. गुंडागर्दी किंवा खंडणीखोरीला बारामतीत अजिबात थारा मिळणार नाही, याची मी खात्री देते.’

‘बारामतीकरांची सेवा करणे म्हणजेच विठ्ठल-पांडुरंगाची सेवा करणे, हाच दादांचा आयुष्यभराचा विश्वास आणि आधार होता. त्यांनी प्रत्येक कामात बारामतीला केंद्रस्थानी ठेवले. आज ते शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसले, तरी इथल्या प्रत्येक विकासकामात त्यांचा स्पर्श आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

खळबळजनक दावा! अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज…

अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या…

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *