खळबळजनक दावा! अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबईः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्यादिवशी अशोक खरात याच्या मोबाईलवर काही मेसेज आले होते, असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. अंजली दमानिया यांनी अलीकडेच अशोक खरात याच्या मोबाईल फोनचा सीडीआर डेटा समोर आणल्यानंतर खळबळ माजली होती.

अंजली दमानिया यांच्याकडे खरात याच्या मोबाईलचा सीडीआर डेटा कुठून आला, याविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. त्याला अंजली दमानिया यांनी आज (सोमवार) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. एका व्यक्तीने आपल्या खरातचा सीडीआर डेटा दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंजली दमानिया यांनी नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याविषयी एक सनसनाटी दावा केला. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर काही मेसेज आले होते. समता पतसंस्थेकडून खरात याला अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी आणि नंतर सतत मेसेज पाठवले जात होते. समता पतसंस्था आणि अशोक खरात याचा काय संबंध आहे?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

अजित पवार यांच्या अपघाताशी समता पतसंस्थेचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. समता पतसंस्थेकडून 27 जानेवारी ते 31 तारखेपर्यंत अशोक खरात याच्या मोबाईल फोनवर जे मेसेज आले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले. अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी तीन विशेष पथक रवाना करण्यात आली आहेत. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात कल्पना खरातच्या मागावर SIT चे पथक रवाना झाले आहे. जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भोंदू अशोक खरातची SIT कडून आज पुन्हा चौकशी सुरु आहे. मात्र, त्याची पत्नी कल्पना फरार आहे, तर मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल आहे. अशोक खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी SIT कडून प्रचंड गोपनीय तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी अशोक खरातच्या समक्ष काही पुरावे आणि पत्नी कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी कल्पना खरातची अटक SIT तपासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

चर्चेचा विषय! रोहित पवार यांचे काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले…

शोक संपायच्या आधीच सत्तेची शपथ!सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा संतप्त सवाल

अंजली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट; अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण…

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *