कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना कमवा आणि शिका योजनेतून मिळणार 2000 रुपये…

chandrakant-patil
Share

सांगली: राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 5 लाख मुलींना कॉलेज फी नाही, होस्टेल फी नाही. या व्यतिरिक्त दर महिना दोन हजार रुपये कमवा आणि शिका योजनेतून देणार असल्याची घोषणा उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीतील मुली व महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षण झालेल्या मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरणासाठी आम्ही नवीन प्रयोग केला. यातून 50 शाळांमधील 36 हजार मुलींना दर आठवडा एक तास शनिवारी कराटे आणि ज्युडो प्रशिक्षण आम्ही दिले. त्यातील पहिला येलो बेल्ट 15 हजार 400 मुलींना आम्ही आज दिला आहे. त्याच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे जे शुल्क द्यावे लागते ते प्रशासन देणार आहे. त्याचबरोबर जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देणार येणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. ते रविवारी सांगलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मुलीचे मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण पाहून मला माझ्या मुलींची आठवण झाली. मला ही दोन मुली आहेत. हे मुलींचे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल, असे खासदार विशाल पाटील यांनी वक्तव्य करताच कार्यक्रमात हशा पिकला. सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी कराटे प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास एक हजार मुलींना यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्रचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफतची घोषणा केली आहे. पंरतु, मुलींकडून फी वसूल केली जात असल्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये घडत आहे.

महाराष्ट्रात ‘मुलींना उच्च शिक्षण मोफत’ची घोषणा; पण परिस्थिती पूर्ण उलटी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *