Video: अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना इराणचं जोरदार प्रत्युत्तर…

iran-war
Share

न्यूयॉर्क : अमेरिका आणि इस्त्रायल यांनी शनिवारी (ता. ) इराणवर मोठ्या प्रमाणावर लष्करी हल्ले केले आहेत. हल्ल्यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळील परिसरालाही लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला आहे.

इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत मध्यपूर्वेत असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणी सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांनी परिसरातील अमेरिकन तळांवर हल्ले केले आहेत. इराणच्या सैन्याने तासाभरात सात पश्चिम आशियाई देशांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिलs. इराणने सात देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हे हल्ले केले. इराणने एकाच वेळी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत, कतार, जॉर्डन आणि इराकवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

इराणने दावा केला आहे की, आपल्या मोहिमेअंतर्गत ते अमेरिकन आणि इस्त्रायली तळे व मालमत्तांना लक्ष्य करत आहेत. या भागातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्येही सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना तातडीने शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाझामधील अलीकडील तणाव आणि कथित शांतता प्रयत्नांनंतर पुन्हा एकदा इस्त्रायलमध्ये आपत्कालीन स्थितीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. इराणकडून संभाव्य क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेला हा लष्करी संघर्ष व्यापक प्रादेशिक युद्धाचे रूप धारण करू शकतो. जागतिक तेलपुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आणि तात्काळ युद्धविरामाचे आवाहन केले आहे. मध्यपूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई सेवांवरही परिणाम झाला आहे. एअर इंडियाने सुरक्षा कारणांचा हवाला देत या भागासाठीच्या आपल्या सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थिती सामान्य होईपर्यंत सेवा स्थगित ठेवण्यात येतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी, सीरियासह आखाती देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले होते. या प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे मार्ग बदलणे किंवा रद्द करणे भाग पडले आहे. तुर्की एअरलाइन्सने देखील 2 मार्चपर्यंत मध्य पूर्वेतील आपल्या उड्डाणे स्थगित केली आहेत. एअरलाइनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि सुरक्षेच्या आढाव्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *