आंबेगाव तालुका पत्रकार संघाला पुरस्कार प्रदान…

aambegaon-patrakar-sangh
Share

आंबेगाव (कैलास गायकवाड): आंबेगाव तालुका पत्रकार संघाला स्वर्गीय वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते कर्जत (ता. रायगड) येथे प्रदान करण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, शरद पाबळे, सुनील लोणकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार यंदा पुणे विभागाच्या साठ तालुक्यातून एकमेव आंबेगाव तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला.

जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई, मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते तालुका पत्रकार संघाचे संस्थापक डी.के.वळसे पाटील, अध्यक्ष संतोष वळसे पाटील व डिजिटल मिडियाचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *