राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्रातील कोणते सात खासदार होणार निवृत्त पाहा…

evm
Share

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. १० राज्यांमधील ३७ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये संपत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ महत्त्वाच्या जागांचा समावेश असल्याने राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ शक्य आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २६ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल आणि उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. निवडणूक बिनविरोध न झाल्यास मतदानानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल स्पष्ट होतील.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ७ जागांसाठी मतदान होणार आहे. एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात बड्या नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. राज्यातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता महायुतीकडे ७ पैकी ६ जागा जाण्याची शक्यता आहे. तर, एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते.

राज्यातील खाली ७ खासदार होणार निवृत्त…
शरद पवार (राष्ट्रवादी शरद पवार गट)
रामदास आठवले (आरपीआय-ए)
प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना ठाकरे गट)
डॉ. भगवत कराड (भाजप)
फौझिया खान (राष्ट्रवादी शरद पवार)
रजनी पाटील (काँग्रेस)
धैर्यशील पाटील (भाजप)

राज्यसभेच्या या निवडणुकीमुळे संसदेतील वरिष्ठ सभागृहाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ७ जागांवर कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळते की जुन्याच दिग्गजांना पुन्हा उमेदवारी दिली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *