मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी अपघाती निधन झाले, त्याच दिवशी अल्पसंख्याक खात्याशी संबंधित अनेक फाईली मंत्रालयात मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागाने ७५ शाळा तथा संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. अल्पसंख्याक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून सूत्रे हलविल्याचा आरोप होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा प्रकार गंभीर्याने घेतलेला असून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सनसनाटी दावा करताना म्हटले आहे की, ‘राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याच्या प्रकरणाचा संशय खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जात असताना त्यांनी संबंधित फाईलचा रेट ३० ते ४० लाख रूपये होता, असा दावा केला आहे. अजित पवार यांचे पार्थिव बारामतीत ठेवले असताना अधिकाऱ्यांनी पैशांसाठी संबंधित फाईलवर तत्काळ स्वाक्षरी केल्याची नाराजी रोहित पवार यांनी बोलून दाखवली.
रोहित पवार म्हणाले, ‘अल्पसंख्याक विभागात आलेल्या संबंधित फाईलचा रेट ३०-४० लाख रूपये होता. त्या सर्व फाईल्सला अजित पवार यांचा विरोध होता, असे कळले. विरोध असतानाही आणि दादांचा अंत्यविधी सुरू असताना केवळ पैशांसाठी संबंधित अधिकारी स्वाक्षरी करण्यात दंग होते. मुख्यमंत्र्यांनी केवळ चौकशीचे आदेश देऊन थांबता कामा नये, तर त्यांनी संबंधित प्रकरण १० दिवसात निकाली काढले पाहिजे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त केले पाहिजे.’
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…