मुंबई : अजित पवार याच्या विमान अपघातामागे काही घातपात असल्याचा संशय उपस्थित करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्सचे सत्य समोर येईलच, पण त्याचवेळी दादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या विमानाचे पायलट ऐनवेळी बदलण्यात आले. त्यांचे जुने पायलट हे ट्रॅफिकमध्ये फसल्याने त्यांच्या जागी ऐनवेळी दुसरे पायलट देण्यात आले. मात्र, आधीचे दोन पायलट, साहिल मदन आणि यश, हे घरातून कधी निघाले? ते कोणत्या गाडीतून बाहेर पडले? ते नेमकं कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये फसले? तसेच मृत्यूमुखी पडलेले सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून कधी निघाले? या सगळ्याचे सीटीटीव्ही जाहीर करावे अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. सगळ्या पायलटांचा दिनक्रम आणि 28 जानेवारी रोजीचे सर्व सीटीटीव्ही फुटेज महाराष्ट्राला कळू द्यावेत अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण! आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू, पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता, कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले, त्या ठिकाणचे सीसटीव्ही फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती.”
अजित पवारांचा अपघात झाला की घातपात घडला याविषयी दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा आहे. त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून पुढे येणाऱ्या माहितीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. मात्र आता या ब्लॅक बॉक्सबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत असून डीकोडिंगसाठी हा ब्लॅकबॉक्स परदेशात पाठवावा लागणार असल्याची माहिती आहे. याबाबत सरकारकडून पुढच्या एक-दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. दरम्यान, विमानाच्या स्थितीबाबत DGCAकडून तपास सुरु असून त्याला अजून 10 ते 15 दिवस लागतील. त्यामुळे ब्लॅक बॉक्ससंदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल.
अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र! दादा आय लव्ह यु. ‘खूप मिस करतोय दादा’…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…
मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी घेतला तिघांवर संशय; थेट नावे सांगितली…