राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांचा उत्साह; EXIT Poll अंदाज भाजपच्या आघाडीचा सुचक

Share

पुणे: पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मतदारांनी आपला मताचा हक्क बजावून दिला, आणि विविध पक्षांच्या आघाडीचा अंदाज साम टीव्हीच्या EXIT Poll मध्ये मांडण्यात आला आहे.

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात भाजप आघाडीवर दिसत आहे, तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

EXIT Poll नुसार अंदाजित जागा खालीलप्रमाणे:

भाजप: 263 जागा

शिंदेसेना: 156 जागा

राष्ट्रवादी (अजित पवार) : 118 जागा

काँग्रेस: 61 जागा

ठाकरे शिवसेना: 48 जागा

मनसे: 6 जागा

जिल्हानिहाय अंदाजित सत्ता:

कोकणातील रायगड व रत्नागिरीत शिंदेसेना आघाडीवर

सिंधुदुर्ग, सातारा व सोलापूरमध्ये भाजप प्रबल

पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आघाडी

मराठवाड्यात महायुतीला बहुमत; लातूर व धाराशिवमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये काटाजोड लढत

सर्व्हेतून मिळालेल्या अंदाजानुसार भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी यांच्यात अनेक जिल्ह्यांमध्ये स्पर्धा स्पष्ट दिसून येते. तरीही, अधिकृत निकाल सोमवार आयोगाकडून जाहीर होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *