पुणे: अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री बनणार असून, शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास होकार कळवला आहे. रात्री उशिरा सुनेत्रा पवार आपली दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासमवेत देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. आज (शनिवार) सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार असल्याबाबत आपल्याला काहीच माहित नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. हा निर्णय मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अंतर्गत चर्चा करून घेतला असावा. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल. याबाबत माझ्याशी चर्चा झाली नाही. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत बैठक घेतली, याबद्दलही आपल्याला काहीच माहीत नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर देखील भाष्य करताना शरद पवार म्हणाले, मागील चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा होती. अजित पवार आणि जयंत पाटील दोघंही यावर चर्चा करत होते. हा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. येत्या १२ तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता. दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे.’
दरम्यान, या वक्तव्यातून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याला थेट ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र विलीनीकरणासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोठे नेते उत्सुक नाहीत. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सुनेत्रा पवार यांच्या हाती उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे दिल्याचा आता चर्चा सुरू झाली आहे.