मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार (वय ६६) यांचा आज (बुधवार) सकाळी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार हे आपली सर्व कामे उरकून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला आहे.
अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कारणीभूत ठरलं ते त्यांच्या मनगटावरचं घड्याळ. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर घड्याळ हेच चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवार यांचा प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने पुढे जात राहिली. पुढे राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यानंतरही घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडेच राहिलं आणि आज मनगटावरच्या घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची शेवटची ओळख पटली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बारामतीमध्ये आज चार सभा होत्या. विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले.
जिथे हे विमान कोसळले तिथे खोलगट भाग आहे. आजुबाजुला झाडं झूडपं आणि उस शेती आहे. शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्रं सहिसलामत राहिली. कदाचित विमान जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाचे दोन तूकडे झाले आणि कागदपत्रं बाहेर फेकली गेली.
विमान अपघाताचा घटनाक्रम…
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.
त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द केला गेला.
धुक्यात रनवेवर करणे कठीण झाले.
दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला. याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.
DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
विमानात कोण कोण होते…
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
महाराष्ट्रावर शोककळा! अजित पवार यांचे विमान अपघातात निधन…
धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा असलेल्या अजित पवार यांची राजकीय कारकीर्द…
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला; पाहा मृतांची नावे…
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय…