पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये आज (बुधवार) मृत्यू झाला आहे. बारामतीमध्ये आज सकाळी झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघाले होते. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केले होते. हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचले. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले. यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झाले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला. लँडिंगदरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. तपास यंत्रणांच्या मते, ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होईल. विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा सर्व डेटा आणि वैमानिकांचे संभाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, पहिल्यांदा विमान वरुन गेल्यानंतर गावातून खालून विमान येत होते. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागले. तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
विमान अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
महाराष्ट्रावर शोककळा! अजित पवार यांचे विमान अपघातात निधन…
धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा असलेल्या अजित पवार यांची राजकीय कारकीर्द…