पुणे: वडगावशेरीतील पठारे कुटुंब आता पुण्यातील राजकारणातील “सुपरफॅमिली” म्हणून चर्चेत आहे. बापूसाहेब पठारे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनील टिंगरे यांना हरवून आमदारपद पटकावले.त्यांच्या मुलांनी मात्र पुन्हा भाजपचा गाळा धरला. सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे यांनी महापालिका निवडणुकीत दणदणीत बहुमताने विजय मिळवला.आता कुटुंबाची दुसरी पिढी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरली आहे. पठारे कुटुंबाची मुलगी पूनम अमोल झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पुरंदरमधील ‘दिवे गराडे’ गटातून तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे भाजपच्या तिकिटावर शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस गटातून निवडणूक लढवत आहेत.
पूनम झेंडे IPS अमोल झेंडे यांच्या पत्नी असून ते पुण्यात PMRDA क्षेत्राचे पोलिस अधीक्षक आहेत. दिपाली गव्हाणे सध्या डिंग्रजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर त्यांचे पती राहुल गव्हाणे उद्योजक आहेत.जर दोन्ही मुली विजयी झाल्या, तर पठारे कुटुंबाने आमदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद अशा तिन्ही महत्त्वाच्या स्तरांवर सत्ता एकवटली असे होईल.यातून स्पष्ट होते की पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये पठारे कुटुंबाचे वजन आता आणखी वाढणार आहे.