नाशिक: पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला आहे.
पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित महिला पोलिसाने घेतला होता. माधवी जाधव असे गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला पोलिसाचं नाव आहे. त्या वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी गिरीश महाजन यांना जाब विचारताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
माधवी जाधव म्हणाल्या, ‘गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत.”
“बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आले नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही,” असा सवालही माधवी जाधव यांनी विचारला आहे.